आंघोळीस गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू..!
___________
पोहण्याचा मोह आदेशच्या जीवावर बेतला…
___________
मूर्तिजापूर :- तालुक्यातील खराब खरबडी येथे तलावात पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. २६ रोजी दुपारच्या सुमारास घडलीये.
सध्या सर्वत्र सोयाबीन सोंगन्याचे दिवस सुरू असल्याने व पुढे तोंडावर दिवाळीचा सण असताना घरची परिस्थिती हालाखीची असल्याने सोयाबीन सोंगन्याच्या थ्रेशर मशीन वर काम करण्याकरिता गेलेल्या मुर्तीजापुर येथील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या आदेश गजानन वाढवे या १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खराब खरबडी येथे शनिवारी दि. २६ रोजी दुपारी १२ ते १२. ३० वाजताच्या सुमारास घटना घडली आहे.
आदेश ह्याची घरची परिस्थिती हालखीची व पुढे दिवाळीचा सन असल्याने दोन पैश्यांच्या आशेने सोयाबीन सोन्याच्या थ्रेशर मशीनवर काम करण्याकरिता गेला असता काम संपल्यावर गावातील तलावावर आंघोळ करण्याकरिता गेलेल्या आदेश वाढवे याचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिकांनी तलावाकडे धाव घेऊन आदेश चा शोध सुरु केला दरम्यान तलावतील एका गाळात आदेश चा मृतदेह अडकल्याच्या अवस्थेत दिसून आला.
मृतदेह गाळातून काढून गावकऱ्यांनी मुर्तीजापुर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे आणला मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
___________ कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our
Terms of Use and acknowledge the data practices in our
Privacy Policy. You may unsubscribe at any time.