अकोल्यात राडा, योगेंद्र यादवांची सभा ‘वंचित’ने उधळली..!
_______________________
अकोला :- महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरमच्या वतीने
(एमडीएफ) सोमवारी अकोल्यात आयोजित विचार
सभेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा घालून सभा उधळून लावली. भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांचे भाषणच कार्यकर्त्यांनी सुरू होऊ दिले नाही. कार्यकर्त्यांनी थेट स्टेजवर जाऊन माईक हिसकावले. वक्त्यांवर प्रश्नाची सरबत्ती केली. ‘भाजपप्रमाणे काँग्रेसही आरक्षण का संपवत आहे, उपवर्गीकरणाच्या मुद्यावर चर्चेच्या वेळी काँग्रेसेचे खासदार लोकसभेत गैरहजर का होते ? तुम्ही महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ कार्यक्रम का घेत आहात ?’ असा प्रश्नांची सरबत्ती केली. हे चालू असताना खाली कार्यकत्यांनी खुच्र्यांची फेकाफेकी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरले व वक्त्यांना सुरक्षित बाहेर काढले. योगेंद्र यादवांनी घटनेचा निषेध केला. प्रकाश आंबेडकर असे कृत्य करा, असे सांगणार नाहीत, असे यादव म्हणाले. दरम्यान, ही वंचितची भूमिका नसल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे म्हणाले.
_________________________________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला.