8 महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळला कसा?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये 2023च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.
मालवणमध्ये बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा फक्त ८ महिन्यातच कोसळला आहे. यावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं नवी मुंबईत महाविकास आघाडी कडूनकडून निषेध व्यक्त केला आहे.