कॉंग्रेसच्या पाठपुराव्याने मोहने ते दुर्गाडी परिवहन बस सेवा सुरु
काँग्रेसचे टिटवाळा मोहने ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण : काँग्रेसचे टिटवाळा मोहने ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी सातत्याने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या परिवहन विभागाकडे पाठपुरावा करून मोहने एचएन बसस्टॉप ते बिर्ला कॉलेज -खडकपाडा-आधारवाडी-दुर्गाडी पर्यंत बस धावणार असून काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार पातकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष सुभाष पाटील, माजी नगरसेवक भिमराव डोळस, काँग्रेसचे जेष्ठ नेते मामा पगारे, जिल्हा उपाध्यक्ष दशरथ पाटील, काँग्रेसचे टिटवाळा शहर अध्यक्ष राजेश दीक्षित, हरिश्चंद्र पाटील, सुरेश सोनार, अँड अजिंक्य साळवे, रमेश रोकडे, विष्णू वाघमारे, रमेश परियार, विजय मोरे, अशपाक शेख यांच्या सह स्थानिक नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून मोहने ते दुर्गाडी बससेवा सुरू होण्यासाठी काँग्रेसचे टिटवाळा -मोहने ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. महापालिका परिवहन विभागाचे अधिकारी यांनीही सहकार्य केले. एक चांगले सामाजिक काम जनतेच्या हिताचे काम वाघमारे यांनी केले आहे, कार्यकर्ता कसा असावा हे राजेश वाघमारे यांच्या कडून शिकले पाहिजे असे सांगितले.
तर काँग्रेसचे टिटवाळा -मोहने ब्लाक अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी सांगितले की, एनआरसी कंपनी बंद पडल्याने मोहने परिसरातील असंख्य महिला कामगार तसेच सुरक्षा रक्षक, शालेय विद्यार्थी व मोलमजुरी करणारे नागरिक खडकपाडा व दुर्गाडी परिसरात दररोज जात आसतात. त्यांना मोहने ते प्रेम आटो पर्यंत बससेवा आहे. त्यांना बिर्ला कॉलेज किंवा दुर्गाडी येथे जायचे आसल्यास पुन्हा रिक्षात बसावे लागत होते. म्हणजे दुहेरी खर्च व वेळ हि लागत होता. या सर्व बाबीचा विचार करून महापालिका प्रशासन परिवहन व्यवस्थापक व अधिकारी यांच्याकडे चर्चा करून त्यांना सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या.
मोहने एचएन बस स्टॉप ते बिर्ला कॉलेज खडकपाडा दुर्गाडी पर्यंत परिवहन बस सेवा सुरु होणे आवश्यक आहे असे सांगून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर परिवहन विभागाने दखल घेऊन 12 मे रोजी बससेवा सुरू करण्याचे आदेश दिले व आज त्या प्रमाणे बससेवा सुरू झाली आहे. सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत फेऱ्या सुरू राहणार आहेत. मोहने ते दुर्गाडी या बससेवेचे १५ रुपये तिकीट असून महिलांना अर्धे तिकीट आहे. तर याच प्रवासासाठी रिक्षाला नागरिकांना ५० ते ६० रुपये किंवा त्याहून जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे या बससेवेमुळे नागरिकांचा पैसा देखील वाचणार आहे.
