Skip to content
By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
CENNEWSCENNEWSCENNEWS
  • होम पेज
  • मुंबई
  • राष्ट्रीय
  • जम्मू-कश्मीर
  • उत्तर प्रदेश
  • हमारे बारे में
  • संपर्क करें
  • Market
Search
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नवी मुंबईतील नालेसफाईची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर व आयुक्तांसह केली प्रत्यक्ष पाहणी
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
CENNEWSCENNEWS
Font ResizerAa
  • होम पेज
  • मुंबई
  • राष्ट्रीय
  • जम्मू-कश्मीर
  • उत्तर प्रदेश
  • हमारे बारे में
  • संपर्क करें
  • Market
Search
  • होम पेज
  • मुंबई
  • राष्ट्रीय
  • जम्मू-कश्मीर
  • उत्तर प्रदेश
  • हमारे बारे में
  • संपर्क करें
  • Market
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
CENNEWS > ब्लॉग > Mumbai > नवी मुंबईतील नालेसफाईची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर व आयुक्तांसह केली प्रत्यक्ष पाहणी
Mumbai

नवी मुंबईतील नालेसफाईची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर व आयुक्तांसह केली प्रत्यक्ष पाहणी

Last updated: May 19, 2026 9:55 pm
cennews
Share
4 Min Read
नवी मुंबईतील नालेसफाईची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर व आयुक्तांसह केली प्रत्यक्ष पाहणी
नवी मुंबईतील नालेसफाईची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर व आयुक्तांसह केली प्रत्यक्ष पाहणी
SHARE

नवी मुंबईतील नालेसफाईची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर व आयुक्तांसह केली प्रत्यक्ष पाहणी

 

महापालिका सर्वसाधारण सभेत पावसाळापूर्व कामांविषयी सविस्तर चर्चा झाल्यानंतर आयुक्त महोदयांनी नाले व गटार सफाईची पहाणी केली होती. त्यामध्ये 60 ते 80 टक्के कामे पूर्ण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता व 15 मे पर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यास अनुसरुन आज नालेसफाई व होल्डिंग पाँडची पाहणी केली असून प्रशासनाने समाधानकारक काम केले असल्याचे निदर्शनास येत असून या पावसाळयात नागरिकांना त्रास होणार नाही असा विश्वास वाटतो असे सांगत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी, पावसाळापूर्व केलेली कामे तेव्हाच यशस्वी मानता येतील जेव्हा पावसाळयात नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही असे मत व्यक्त केले. मार्गील वर्षी 15 मे पासून पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षी मात्र पाऊस काहीसा उशिरा येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्या अनुषंगाने ही सुरु असलेली कामे अशीच गतीमानतेने सुरु ठेवावीत असे आदेशित करत भर पावसात पुन्हा पाहणी दौरा करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी दिघ्यापासून बेलापूरपर्यंत सुरुवात करत नैसर्गिक नालेसफाई कामांची तसेच विशेषत्वाने होल्डिंग पाँड स्वच्छतेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपमहापौर श्री. दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ तसेच आपापल्या विभागांमध्ये तेथील स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. संजय शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व इतर अधिकारी या दौ-याप्रसंगी उपस्थित होते.

दिघा येथील ग्रीन वर्ल्ड जवळील नाल्यामधून एमसीडीसीएलच्या मोठया वायर्स जात असल्याने नाल्यात नागरिकांमार्फत टाकला जाणार कचरा अडकून राहतो. ही परिस्थिती अनेक ठिकाणी निदर्शनास येते, त्यामुळे या वायर्स एकत्रितपणे वरच्या बाजूला बांधून ठेवाव्यात जेणेकरुन प्रवाहातील वाहते पाणी अडणार नाही व रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महापौर महोदयांनी दिले. या स्वच्छ केलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनीही प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पिशव्या अथवा कचरा न टाकण्याची दक्षता घ्यावी जेणेकरुन ते पुन्हा अस्वच्छ होणार नाही असे आवाहनही महापौरांनी केले.

काही ठिकाणी उद्योगसमुहांच्या बाजूने वाहत असलेल्या नाल्यांमध्ये कंपनीच्या बाजूने कचरा टाकला जातो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी उद्योग समूहांसोबत समन्वय साधण्याचेही महापौरांनी निदर्शित केले.

दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, एपीएमसी मार्केट, एमआयडीसी क्षेत्र, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, बेलापूर अशा विविध क्षेत्रांमधील नाले सफाईची पाहणी करण्यासोबतच होल्डिंग पाँड क्षेत्रांचीही महापौरांनी पाहणी केली.

होल्डिंग पाँडमध्ये 70 ते 80 टक्के गाळ भरलेला असून खारफुटीमुळे गाळ काढण्यास परवानगी मिळत नाही. याबाबत वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्यामार्फत परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरच यश येईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. तोपर्यंत होल्डिंग पाँडच्या जेवढ्या भागाची परवानगी आहे तेथील गाळ काढणे सुरु असून होल्डिंग पाँडच्या ठिकाणी जास्त क्षमतेचे पाणी उपसा पंप बसवले जात आहेत. जेणेकरुन अतिवृष्टी काळात होल्डिंग पाँडमध्ये  जमा होणारे पावसाचे पाणी  उपसून खाडी भागात टाकण्यात येईल. होल्डिंग पाँड हे नवी मुंबई शहराचे सुरक्षा कवच असून ते संरक्षित राखण्यासाठी गतीमान पावले उचलण्यात येत आहेत असेही महापौरांनी सांगितले.

नवी मुंबई क्षेत्रात काही सखल भाग असून भरती आणि अतिवृष्टी एकाचवेळी आल्यास त्या भागात काही प्रमाणात पाणी साचते. अशा ठिकाणी अधिकच्या पाणी उपसा पंपांची आधीच सोय करुन ठेवावी असे निर्देश महापौर महोदयांनी दिले. पावसाळी कालावधीत सर्व विभाग कार्यालये तसेच मुख्यालय या ठिकाणी  24 X 7 हेल्पलाईन कार्यान्वित असेल व आपत्त्कालीन मदत कक्ष सुरु राहील  याची प्राधान्याने अंमलबजावणी करावी असेही महापौरांमार्फत निदर्शित करण्यात आले.

दिघ्यापासून सुरु झालेल्या या पाहणी दौ-यात श्रीम.चांदणी चौगुले, श्रीम.गौरी आंग्रे, श्रीम.सायली शिंदे, श्रीम.दिव्या गायकवाड, श्रीम.प्रणाली लाड, श्रीम.सोनवी लाड, डॉ.प्रणाली पाटील, श्री.भाऊ भापकर, श्री.सुनिल कुरकुटे, श्रीम.शुभांगी पाटील, श्रीम.शशिकला पाटील, श्रीम.कविता पाटील, श्रीम.सलुजा सुतार, श्री.अमित मेढकर आदी पदाधिकारी, नगरसेवक – नगरसेविका आपापल्या क्षेत्रामध्ये उपस्थित होते.

एकंदरीतच नवी मुंबईतील नाले सफाई कामांची पाहणी केल्यानंतर समाधानकारक काम झाले असल्याचे दिसून येत असून या कामाचा वेग असाच सुरु ठेवावा व नवी मुंबईकर नागरिकांना पावसाळयात पाणी भरणार नाही असा दिलासा देणारे काम करावे असे निर्देश देत नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी पावसाळी कालावधीतही नागरिकांच्या अडी – अडचणीत तत्पर मदतकार्य पुरविण्यासाठी 24 X 7 आपत्कालीन कक्ष कार्यरत ठेवावेत असे आदेशीत केले.

You Might Also Like

नासिक मे पहली बारिश आने पर निफाड़ के किसान की खुशी का ठिकान नही रहा

खारघर में पानी संकट पर बवाल, बिल्डर पर महिलाओं पर डिफेंडर चढ़ाने की कोशिश का आरोप; कार्यालय का घेराव

नासिक विधान परिषद चुनाव में निर्दलीय उम्मीदवार गोकुल गीते की बड़ी जीत

नासिक विधान परिषद चुनाव में महायुति को झटका बीजेपी के बागी गोकुल गीते चुनाव जीते

नासिक के इंदिरा नगर के कलानगर ट्रैफिक सिग्नल पर दो गुटों मे बीच सड़क पर दे दना दन आप इन तस्वीरो मे देख सकते हैं कैसे दो गुट आपस मे एक दूसरे को मार रहे हैं

TAGGED: नवी मुंबईतील नालेसफाईची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर व आयुक्तांसह केली प्रत्यक्ष पाहणी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Share
Previous Article तेल की बढ़ती कीमतें: वैश्विक अर्थव्यवस्था की रफ्तार पर ब्रेक स्वावलंबन और आत्मनिर्भरता राष्ट्र के विकास के आधार स्तंभ।
Next Article आमरण अनशन पर बैठे आंदोलनकारी की मां की तुर्भे स्टोर में निर्मम हत्या; पुलिस द्वारा आरोपियों की तलाश जारी आमरण अनशन पर बैठे आंदोलनकारी की मां की तुर्भे स्टोर में निर्मम हत्या; पुलिस द्वारा आरोपियों की तलाश जारी
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

235.3kFollowersLike
69.1kFollowersFollow
11.6kFollowersPin
56.4kFollowersFollow
136kSubscribersSubscribe
4.4kFollowersFollow
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

NASIK
नासिक मे पहली बारिश आने पर निफाड़ के किसान की खुशी का ठिकान नही रहा
Mumbai June 23, 2026
भारतीय जनसंघ के संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जी के बलिदान दिवस पर आज लखनऊ में उनकी प्रतिमा पर पुष्प अर्पित कर श्रद्धांजलि दी।
भारतीय जनसंघ के संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जी के बलिदान दिवस पर आज लखनऊ में उनकी प्रतिमा पर पुष्प अर्पित कर श्रद्धांजलि दी।
UP June 23, 2026
पीएम मोदी से मिले ब्र‍िक्‍स देशों के राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार, वैश्विक चुनौतियों पर हुई चर्चा
पीएम मोदी से मिले ब्र‍िक्‍स देशों के राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार, वैश्विक चुनौतियों पर हुई चर्चा
National June 23, 2026
पद्म पुरस्कार- 2026: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने रोहित शर्मा को पद्मश्री से सम्मानित किया
पद्म पुरस्कार- 2026: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने रोहित शर्मा को पद्मश्री से सम्मानित किया
Sports June 23, 2026
CENNEWSCENNEWS
Follow US
© 2026 cennews.in. Designed by Adcraft India. All Rights Reserved.
Join Us!

Subscribe to our newsletter and never miss our latest news, podcasts etc..

[mc4wp_form]
Zero spam, Unsubscribe at any time.
CEN News official Logo CEN News official Logo
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?