कामगार मंत्री ऍड आकाश फुंडकर यांनी घेतला सदस्य नोंदणीचा आढावा…!
—————————————-
मूर्तिजापूर :- “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी आत्ताच्या घडी पासून कामाला लागून, पुढील केवळ १२ दिवस प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून भाजपाला येणाऱ्या काळात महानगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती वर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहे. पक्षाची बांधणी ही दर ३ वर्षांनी होत असून, या माध्यमातूनच या पुढे जो कार्यकर्ता जास्त नोंदणी करेल त्याचाच विचार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणीकीत केला जाईल. लोकसभेत निगीटिव्ह नोंदणी झाली तरी देखील मूर्तिजापूर वासियांनी विधानसभा मध्ये दाखवीत भाजपने गड जिंकलाय असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री ऍड आकाश फुंडकर मूर्तिजापूर येथे आयोजित सदस्य नोंदणी च्या आढावा बैठकीच्या वेळी बोलत होते”.
राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकी च्या विजया नंतर भारतीय जनता पार्टी ने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकी करिता कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. या करिता गेल्या काही महिन्यांपासून राज्यात भाजपा च्या वतीने सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले.
मूर्तिजापूर -बार्शीटाकळी तालुक्याचा सदस्य नोंदणी अभियान चा राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्या चे पालकमंत्री ना.ऍड आकाश फुंडकर यांनी मूर्तिजापूर येथे आमदार हरिष पिंपळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन पुढील कार्यकरिता निर्देश देण्यात आले.
या वेळी राज्याचे कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविल्या नंतर मूर्तिजापूर शहरात ऍड आकाश फुंडकर यांचा प्रथमच दौरा झाल्याने आमदार हरिष पिंपळे व भाजपा च्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री आकाश फुंडकर यांचा सत्कार करण्यात आला तर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी मंत्री आकाश फुंडकर यांच्या स्वागत केले. दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पार्टी ला मिळालेल्या यशा बद्दल भगत सिंग चौकात आमदार हरिष पिंपळे यांच्या सह भाजपा च्या कार्यकर्त्यांनी फाटक्यांची आतिषभजी करीत ढोल तश्याच्या तलावर नाचत एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला.
या वेळी आमदार हरिष पिंपळे, भाजपाचे मुर्तीजापुर तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, भाजयुमो चे तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, शहराध्यक्ष रितेश सबाजकर, विनायक वारे, कमलाकर गावंडे, हर्षल साबळे, राम जोशी, बाबुसाहेब देशमुख, सचिन देशमुख, राम नेमाडे, राहुल गुल्हाने, संतोष गोलाईत, सचिन खरतडकर, राहुल अग्रवाल, योगेश फुरसुले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर -अकोला.