ब्रेकिंग न्यूज | अकोला | CEN News
“महिला अत्याचार प्रकरणी दोषींना फासावर लटकवा” – ऑल इंडिया पँथर सेनेचा जिल्हाधिकाऱ्यांना तीव्र निषेध
अकोला – राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महिला आणि युवतींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर ऑल इंडिया पँथर सेने ने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अकोला शहराध्यक्षा पुजाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
या निवेदनात सांगण्यात आले की,
“बदलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यातील साक्षी कांबळे हिला ब्लॅकमेल करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना ही समाजाला हादरवणारी आहे. त्यामुळे अशा अमानुष कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.”
पुजाताई जाधव यांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले –
“महिलांवर अत्याचार करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून फासावर लटकवले पाहिजे. प्रशासनाची कारवाई संथ गतीने सुरू आहे, हे निषेधार्ह आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत.”
या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. आंदोलकांनी प्रशासनाला इशारा दिला की,
जर त्वरित कारवाई केली नाही, तर उग्र आंदोलन छेडले जाईल.
कॅमेरामन: अमेय आगळेकर
विदर्भ ब्युरो चीफ: प्रतिक कुर्हेकर
📍 CEN News | अकोला