मूर्तिजापूर येथे वाईन शॉपीचे शटर फोडून रोख तसेच मद्याच्या बाटल्या लंपास..!
————————————–
आठवड्याभरातील दुसरी घटना..!
५० हजार रोख तर २० हजारांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी केला हात साफ..!
—————————————-
अकोला/मूर्तिजापूर :- येथील स्टेशन विभाग परिसरातील वाईन शॉपीचे शटर फोडून दोन अज्ञात भुरट्या चोरट्यांनी शॉपीतील रोख रक्कम व मद्याच्या बटल्यांवर हात साफ केल्याची घटना घडलीये.
मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरात असलेल्या नेभनानी कॉम्प्लेक्स मधील महाजन वाईन शॉपी मध्ये गुरवार दि. २८ च्या पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी शॉपीचे शटर तोडून रोख ५० हजार रुपयांची रक्कम व २० हजार रुपयांच्या मद्याच्या बाटल्याचा मुद्देमाल असा एकूण ७० हजारांची दुकानफोडी झाल्याचे महाजन वाईन शॉपीचे संचालक अमन रवींद्र महाजन यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला असून यातील चोरटे हात साफ करतांना स्पष्ट दिसत आहेत.
विशेष म्हणजे आठवड्याभरातीलच ही मुर्तीजापुर शहरातील दुसरी घटना असून यापूर्वीही दोन ते तीन दिवसांपूर्वी शहरातील कोकणवाडी येथे ही रात्रीच्या वेळी घरी कोणी नसताना घरफोडी करून चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली आहे.
घटनेचा तपास मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात मुर्तीजापुर शहर पोलीस करीत असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पाहणी केली.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर -अकोला.