वर्धा जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेला जिल्हा आहे.
त्यामुळे विकासाच्या बाबतीत हा जिल्हा कुठेही मागे राहता कामा नये. सर्व विभागांनी एकत्रितपणे लोकाभिमुख कामे करा. विकासकामांसाठी आवश्यक सहकार्य शासनाच्यावतीने करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील विविध विकासकामे व योजनांच्या आढावा बैठकीत सांगितले.