*वाल्मीक कराडच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी मारले जोडे फाशी देण्याची केली मागणी*
*शेगाव:-* मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणी करिता मंगळवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोपी वाल्मीक कराडच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून घटनेचा निषेध व्यक्त केला.सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे व्हिडिओ व छायाचित्र व्हायरल झाले. आरोपींनी अतिशय क्रूरपणे सरपंच देशमुख यांची हत्या केली. या घटनेचा तीव्र संताप शिवसैनिकांनी प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला. तालुकाप्रमुख रामा थारकर, शहर प्रमुख संतोष लिप्ते यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले…
बाईट– रामा थारकर, तालुकाप्रमुख शिवसेना
बाईट –संतोष लिप्ते शहर प्रमुख शिवसेना
……………………………….
*जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख Cen news शेगाव -बुलढाणा*