वडगाव-कुरुम येथील सरपंचाच्या विरोधात अविश्वास पारीत
————————————-
मूर्तिजापूर तालुका व जिल्ह्यातील पहिला प्रकार
—————————————-
२ वर्षांपूर्वी जनतेतून थेट निवडून आल्या होत्या बिजुबाई हिंगणकर
—————————————-
२८६ विरुद्ध १६९ अशी शिरगणना करून घेण्यात आले मतदान
—————————————-
Anchor :
नियमाप्रमाणे ग्रामविकासाचे कामे करुन निवडून दिलेली जनता व ग्रामपंचायत सदस्यांना वर्षभरात माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र वडगाव -कुरुमच्या सरपंच्या बिजुबाई हिंगणकर यांनी नियमांचा भंग केला. त्यामुळे गावात मतदान घेण्यात आले .यावेळी सरपंच्या विरोधात ६ सदस्यांनी मतदान केले असून समर्थनार्थ स्वतः आणि एका सदस्यांने मतदान केले .२७ जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेतचे आयोजन करुन शिरगणना करण्यात आली .
यावेळी २६८ विरुद्ध १६९ असा विश्वास प्रस्ताव पारीत करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या २७ जुलै २०२२ च्या ग्रामविकास विभागाच्या राजपत्रानुसार आदेश पारीत करून तहसीलदार शिल्पा बोबडे यांना सरपंच्याना पदावरून अपात्र घोषित केले आहे. त्यांच्या विरोधात वडगाव- कुरुम येथील उपसरपंच ईश्वर गुलाब मांडोकर , ग्रामपंचायत सदस्य कैलास गोविंद सुलताने , फुला राजेश मांडोकर , उज्वला सुनील सुलताने , संतोष मनोहर देऊळकर , वैशाली पंकज मोहड या सहा सदस्यांनी विरोधात
हे प्रकरण दाखल केले होते.
सरपंच्या बिजुबाई हिंगणकर ह्या वडगाव येथे मुख्यालयी हजर राहत नसून बाहेरगावी वास्तव्यास असणे , राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष असणारा मुलगाच गावाचा कारभार सांभाळतो , जलजीवन योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीचे तसेच पाईपलाईन निकृष्ठ दर्जाचे टाकल्याचा तक्रार , सदस्यांना विश्वासात न घेता कामे पार पाडणे , मासीक सभेच्या कामकाजाचे रजिस्टर बंद न करता गैरकायद्यांच्या नोंदी घेतल्या जातात , नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत युतीधर्म न पाळता दुसऱ्या उमेदवाराला मतदान करणे भोवले तसेच गावातील आदिवासी व भटक्या वस्ती समाजाने भाजपाला मतदान केल्याने अजीत पवार गटाचा युवक आघाडीचा जिल्हाध्यक्ष असणाऱ्या सरपंच्या यांच्या मुलाने हेटाळणी करण्याच्या उद्देशाने आठ दिवस हेतुपुरस्सर पाणी पुरवठा न करणे , इतिवृत सादर न करणे अश्या अनेक प्रकरणात नियमाचे उल्लंघन केल्यावरून २६ नोव्हेंबर २०२४ रोजी तहसीलदार यांना पत्र देण्यात आले होते, २ जानेवारी रोजी तहसीलदार यांनी वडगाव ग्रामपंचायतीत सदस्यांचे मतदान घेतले असता ६ विरुद्ध २ असा ठराव पारीत झाला होता . मात्र बिजुबाई हिंगणकर हे गेल्या दोन वर्षांपूर्वी जनतेतून थेट निवडून आल्या असल्याने प्रशासनाने कायदेशीर बाबी तपासून सोमवारी २७ जानेवारी रोजी विशेष ग्राम सभेचे आयोजन करुन उपस्थित ४४९ ग्रामस्थांपैकी २६८ विरुद्ध १६९ सरपंच्या विरोधात मतदान केले .याला विधानसभा निवडणुकीत अजीत पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असताना गावात रवि राठी यांचा प्रचार करून समाजाचे निवडक मतदान पदरात पाडून घेतल्याने गावातील आर्थिक दुरबल घटकातील ग्रामस्थांनी भेदभाव केल्याने सदरचा प्रकार घडल्याची चर्चा ग्रामस्थांकडून ऐकायला मिळाली . सरपंच्यानी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारीत करीत अपात्र घोषित केल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमाला मिळाली .
सदरची निवडणूक व शिरगणना प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार शिल्पा बोबडे , निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेश नागोलकर , कुरुमचे मंडळ अधिकारी राजेंद्र देवीकर , विस्तार अधिकारी विजय कीर्तने , ग्रामसेवक मुंदे , ग्राममहसूल अधिकारी दिलीप करवते , दिपक अवधुत , विक्रम जगताप यांनी हजेरी लावली .
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.