उद्या रेल्वे च्या तिन्ही मार्गावर ब्लॉक
लोकल रेल्वे प्रवाशांमागील शुक्लकाष्ट सुरूच
मुंबई :- लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांना या दिवशी नेहमीप्रमाणे मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५ आणि ६ व्या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी साडेबारा या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यामुळे काही अप आणि डाउन मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे, तसेच ९ मेल- एक्स्प्रेस गाड्यांना लेटमार्क लागणार आहे.
हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान पोर्ट लाइन वगळून सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ या कालावधीत अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावर सकाळी १०:३४ ते दुपारी ३:४० वाजेपर्यंत पनवेलवरून सीएसएमटीकडे आणि सकाळी ९:४५ ते दुपारी ३:१२ या कालावधीत सीएसएमटीवरून पनवेल- बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील.
ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ वाजेपर्यंत पनवेलवरून ठाण्याकडे जाणाऱ्या सकाळी १०:०१ ते दुपारी ३:२०
पर्यंत ठाण्यावरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रद्द राहतील. अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आलीये.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News, मुंबई.