त्या डागडुगीचा कालमर्यादीत झालेले काम…!
—————————————-
काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी कडून सार्वजनिक बांधकाम विभागास बदनाम करण्याचे कट कारस्थान..!
—————————————-
मूर्तिजापूर :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळ सर्वत्र राजकीय पक्षांकडून सुरु आहे.अश्यातच एका पक्षाच्या उमेदवारा करिता उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मूर्तिजापूरात येणार आसल्याने संबंधित कंत्राक्तदाराने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये या उद्देशाने सदर रोड ची रस्ता दोष दाईत्व कालावधीत असल्याने मरम्मत करण्यात आली. परंतु शहरातील काही प्रसार माध्यमांच्या विघ्नसंतोषी पत्रकारा कडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माथ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. सदर पत्रकारांनी संबंधित विभागाची कुठलेही प्रकारचा संपर्क, माहिती अथवा विचारणा न करता आर्थिक फायदा करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाला बदनाम करण्याचे कट कारस्थान केल्या गेल्याचे पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर. डी. नवलकार यांनी माहिती दिली.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.