श्रीक्षेत्र #आळंदी येथे वेदश्री तपोवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘संत कृतज्ञता संवाद’ कार्यक्रमात उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत, धर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले.
भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून संतांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संत कृतज्ञता संवाद’ कार्यक्रमात केले.
श्रीक्षेत्र आळंदी येथे वेदश्री तपोवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, पर्यावरणीय व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आ.उमा खापरे, आ.महेश लांडगे, आ.शंकर जगताप, आ.अमीत गोरखे, आचार्य स्वामी गोविन्ददेव गिरी महाराज, हभप ब्रम्हगीरी मारोती महाराज कुसेकर, भास्करगिरी महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मारुती महाराज कुरेकर यावेळी उपस्थित होते.