*ठाणे येथील माजीवाडा परिसरात अचानक आग लागल्याने एकच खळबळ….!*
*ठाणे :-* येथील माजिवाडा परिसरात अचानक एका चारचाकी गाडीला आग लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
. ठाणे हे शहर मुंबईतील गजबजलेले शहर म्हणून ओळखल्या जाते त्यातच ठाण्यातील माजीवाडा परिसरात मोठी गर्दी पहावयास मिळते. या परिसरात मंगळवारी सकाळी ११ ते ११. ३० वाजताच्या सुमारास कचरा पेटवण्याच्या नादात चक्क एका चार चाकी वाहणाला आग लागल्याने नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली, विशेष म्हणजे वृत्तलिहे पर्यंत अग्निशमन दलाचे कुठलेही वाहन न पोहचल्याने नागरिकांनी अक्षरशः घरातील बादल्या -बादल्या ने पाणी फेकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी अथवा जखमी झाले नसले तरी शहराची स्वच्छता राहावी याकरिता महानगरपालिका अथवा प्रशासनाच्या वतीने करोडो रुपये खर्चून नागरी घनकचरा संकलनाचा व कचरा निर्मूलनाचा कंट्रक दिला असल्यावरही शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात तर महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळेच सदर घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
—————————————-
*प्रतिनिधी तेजस्वी जगताप, CEN News, ठाणे.*