*शिक्षक व पदवीधरांसाठी केलेला उल्लेखनीय कार्याबद्दल शुभांगी ताई पाटील यांचा महिला दिनी माजी पदवीधर आमदार डॉ सुधीर सुधीर तांबे यांच्या कडून सत्कार*
धुळे लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार डॉ. शोभाताई बच्छाव व डॉ दिनेश बच्छाव यांच्याद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विविध क्षेत्रात कर्तुत्ववान असलेल्या महिलांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात शिवसेनेच्या राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगी ताई पाटील यांनी पदवीधर व शिक्षकांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या द्वारे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंचावर खा.डॉ. शोभा बच्छाव, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष धरती ताई देवरे, धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, धुळे महानगरपालिकेच्या माजी महापौर कल्पना काकू महाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, माजी आमदार प्रा शरद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रंजीत राजे भोसले, तसेच प्रशासनातील महिला अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
