टॅक्टर व ऑटो च्या अपघातात ३५ वर्षीय युवक जागीच ठार तर एक महिला गंभीर…!
मूर्तिजापूर :- तालुक्यातील धोत्रा फाट्या नजिक टॅक्टर ने ऑटो ला धडक दिल्याने अपघात घडलाय. या अपघातात एका ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार च्या सायंकाळी घडली.
अमरावती जिल्यातील गनोरी येथील गोपाल सुरेश पाचरे हे आपल्या परिवारा सह मूर्तिजापूर तालुक्यातील एका ठिकाणी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त देवदर्शनाकरिता गेले असता कार्यक्रम संपवून एम. एच २७ बी. डब्लू ४३७५ क्रमांकाच्या ऑटोने गनोरी येथे परतीच्या मार्गाने पिंजर ते मूर्तिजापूर रोड ने जात असतांना धोत्रा शिंदे फाटा नजिक ऑटो ला अज्ञात ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने ऑटोतील प्रवाशी गोपाल सुरेश पाचरे ३५ वर्ष हे ऑटोतून खाली पडल्याने त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचा चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला तर छाया निलेश पाचरे वय ४० रा गनोरी ता. भातकुली जि. अमरावती ह्या गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघांचे आमदार हरिष पिंपळे यांनी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मुर्तीजापुर येथे धाव घेऊन मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News मूर्तिजापूर -अकोला