सुभाष दुध डेअरीतील कामकारी युवकावर लोखंडी रॉड ने हल्ला..!
मूर्तिजापूर शहरात गुंड प्रवृत्ती च्या युवकांची दादागिरी, व्यापारी धास्तावले..
—————————————-
मूर्तिजापूर :- शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या करिता पोलीस प्रशासन नेहमीच २४ तास तत्पर असत मात्र मूर्तिजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांवरून गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक जणू कमीच झाला असल्याचे नुक्यात्याच घडलेल्या शहरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या सुभाष दूध डेअरीत काम करणाऱ्या युवकावर झालेल्या लोखंडी रॉड ने हल्ल्या वरून स्पष्ट होत आहे.
शहरातील जुनी वस्ती परिसरात सुभाष दूध डेअरीची शाखा असल्याने सकाळी व सायंकाळी या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते, १६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दूध डेअरीत काम करण्याऱ्या विशाल शरद पवार नामक १८ वर्षीय युवकास आरोपी अब्दुल जफर अब्दुल अन्नान या ३२ वर्षीय युवकाने शुल्लक कारणा वरून लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची गांभीर्य जनक घटना समोर आली आहे आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे. मारहाण करण्याचे निमित्य होते ते म्हणजे ” मला आधी दुध का नाही दिले, मि कोण आहे ओळखत नाही का..? ” एव्हडेच. या घटने मुळे मात्र व्यापारी वर्गात मोठी भीती निर्माण झालीये. शहरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्याने चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकाविणे, मोबाईल चोरी, घर फोडी, व्यापाऱ्यांना धमाकावीत मारहाणी अशा विविध घटना घडल्याने नागरिक व व्यपारी वर्ग असुरक्षित असल्याचे बोलल्या जात आहे.
या घटने वरून आरोपी अब्दुल जफर अब्दुल अन्नान वय ३२ वर्ष रा. मलाईपुरा जुनी वस्ती याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३३३, ११८(१), ३५२, ३५१(२) कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली पुढील तपास शहर पोलीस स्टेशन चे वरिष्ट निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक आशिष शिंदे, गणेश सूर्यवंशी,अंमलदार सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, पो. कॉ सचिन दुबे, गजानन खेडकर, विजय साबळे करीत आहे.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.