अकोला :- जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती स्थित असलेल्या नॅशनल उर्दू हायस्कूल मध्ये एका ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची वर्ग खोलीत ऑक्सिजन कमी मिळाल्याने भोवळ येऊन अचानक बेशुद्ध झाल्याची घटना समोर आलीये.

शासकीय नियमानुसार विद्यालय अथवा महाविद्यालय उभारतांना विद्यार्थ्यांना खेळणायाकरिता भव्य मैदान,भरपूर सूर्यप्रकाश पडणाऱ्या व ज्यात हवा खेळती राहावी अश्या वर्ग खोल्या, प्रथमोपचार किट, अग्नि सुरक्षा किट,शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वर्ग खोलीत पंखे आदी सुविधा असणे अनिवार्य असते मात्र मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती स्थित हलवाई पूरा येथे असलेल्या नॅशनल उर्दू हायस्कूल ची संपूर्ण इमारतच केवळ ७२६ स्क्वेअर फुटामध्ये उभारली असल्याने सदर शाळेला कुठल्या नियमानुसार परवानगी देण्यात आली..? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
काही दिवसांपूर्वी नॅशनल उर्दू हायस्कूल मुर्तीजापुर येथील ९ वीत शिकणाऱ्या शोयबा तसनिम मोहम्मद हनिफ या विद्यार्थिनीची शाळेत तासिका सुरू असताना वर्गात अचानक भोवळ येऊन बेशुद्ध झाल्याने तिला उपचारार्थ शहरातील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी व उपचाराअंती सदरहू विद्यार्थिनीची वर्ग खोलीत ऑक्सिजन कमी मिळाल्याने तब्येत खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विशेष म्हणजे सदर शाळा ही चक्क एका कित्येक वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या घरातच थाटली असल्याचे पालकांनी बोलतांना सांगितले. तर एव्हढच नव्हे तर गम्मत म्हणजे या शाळेला ११ बाय २१ च्या ३ वर्ग खोल्या असून एका वर्गात जवळपास 60. हून अधिक विद्यार्थी अक्षरशः गुरा ढोरांसारखे कोंबून बसवले जातात.मुलांना खेळण्यासाठी कुठलेही भव्य पटांगन ही नसल्याची खंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे. तर शाळेत साधं पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था नसल्याचे चक्क विद्यार्थ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. शासनाच्या नियम मोडणाऱ्या अश्या शैक्षणिक संस्थेवर कुठल्या राजकीय पक्षाचा अथवा पदाधिकाऱ्यांचा डोक्यावर हात आहे जेणेकरून अद्याप पर्यंतही प्रशासनाच्या वतीने पालकांकडून वारंवार तक्रार करूनही अद्यापही कार्यवाही होत नाही..? असा प्रश्न संतप्त पालकांनी केला आहे.
___________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर- अकोला.