ब्रेकिंग न्यूज | अकोला | CEN News
राज्यातील महिला अत्याचारांवर तीव्र संताप – ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अकोला – राज्यभरात महिला व युवतींवर वाढत चाललेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पँथर सेनेच्या महिला शहराध्यक्षा पुजाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
पुजाताई जाधव यांनी सांगितले की,
“बदलापूर, नाशिक, अकोला, अमरावती यांसारख्या जिल्ह्यांमध्ये महिला व युवतींवर अत्याचारांच्या घटना वाढल्या असून नुकतेच बीड जिल्ह्यातील साक्षी कांबळे या युवतीला ब्लॅकमेल करून आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आले. हे प्रकार अत्यंत निंदनीय असून दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी.”
तसेच त्यांनी प्रशासनाच्या संथ कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की,
“दोषींना फासावर लटकवले पाहिजे. अशा समाजकंटकांना कायमचे थांबवणे गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावी.”
या निवेदनाद्वारे ऑल इंडिया पँथर सेनेने राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर आवाज उठवला असून प्रशासनाला जागृत होण्याचा इशारा दिला आहे.
कॅमेरामन: अमेय आगळेकर
विदर्भ ब्युरो चीफ: प्रतिक कुर्हेकर
CEN News | अकोला