समाजसेवक कृपा बोरकर यांनी स्वखर्चाने केली गटाराची साफसफाई..!

अकोला :- मूर्तिजापूर शहरातील नगर परिषद परीक्षेत्रातील असलेल्या गाडगे बाबा गौरक्षण जवळील रेल्वे पुलाखालील सांड पाण्याच्या नाल्यामुळे येथील राहणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र समाजसेवक कृपागत बोरकर व त्यांचे बंधू भाऊगत बोरकर यांच्या पुढाकारणे जेसीबी च्या सहाय्याने नालायची साफ सफाई करण्यात आली.
गेल्या कित्येक वर्षांपासून गाडगेबाबा गौरक्षण रेल्वे पुला खालून वाहणारा भुयारी गटार सांड पाण्याच्या रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे येथील नागरिक व वाहतूक करणारे शालेय विद्यार्थी वाहतूकदार मोठे त्रस्त होऊन मनस्ताप सहन करत होते. गाडगेबाबा गौरक्षांचे सागर देशमुख यांनी केलेल्या आव्हानास अनुसरून नागरिकांच्या हितार्थ शहरातील समाजसेवक कृपागत बोरकर व त्यांचे बंधू भाऊगत बोरकर यांच्या पुढाकाराने स्वयंस्फूर्तीने शासनाची कुठलीही मदत न घेता स्वखर्चाने जेसीबी लावून गटार साफ करून सांडपाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. या भुयारी मार्गातून गेल्या कित्येक वर्षांपासून गटाराचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने शाळेकरी विद्यार्थी व नागरिकांना मोठा कसरतीचा सामना करत नाही नाईजालास रेल्वे लाईन क्रॉस करावा लागत होता. रेल्वे लाईन क्रॉस करताना भविष्यात कुठलीही विपरीत घटना घडेलच असे नाकारता येत नव्हते याचे गांभीर्य लक्षात घेता व गाडगे बाबांचा मूलमंत्र ध्यानात घेऊन समाजसेवक कृपागत बोरकर यांनी यांच्या सहकार्यासह स्वखर्चाने जेसीबी लावून त्वरित गटार ची साफसफाई करून सांड पाण्याचा मार्ग मोकळा केल्याचे उत्पादक बोरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
___________
कॅमेरामन शाम वाळस्कर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर -अकोला.