सर नमस्कार
एक प्रसिद्धी पत्र पाठवत आहे.
उदयन्मुख खेळाडू गुणगौरव तसेच ज्येष्ठ प्रशिक्षक संघटक व क्रीडा कार्यकर्ते गुणगौरव समारंभ 2025
ji
क्रीडावेध मुंबईच्या माध्यमातून बृहन्मुंबई विभागातील विविध क्रीडा संघटनांना एकत्रित करत बृहन्मुंबई विभागाचा क्रीडा विकास साध्य करण्याचा माजी खासदार श्री मनोज कोटक यांनी संकल्प सोडला आहे.
विविध क्रीडा स्पर्धा बृहन्मुंबई विभागाच्या खेळाडू व प्रशिक्षक यांच्या क्रीडा कामगिरीचे अभिनंदन सन्मान सोहळा द्वारे करत असताना क्रीडा विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे व क्रीडा क्षेत्रात दीर्घकाळ भरीव योगदान करणारे जेष्ठ प्रशिक्षक संघटक व क्रीडा कार्यकर्ते यांचा गुणगौरव मुंबई क्रीडा वेध तर्फे करण्याचा समितीचा मनोदय आहे.
कोणत्याही स्पर्धेत प्रथम तीन खेळाडूंना पदके तसेच रोख रकमेने सन्मानित करत असताना त्यानंतरच्या क्रमांकावरील खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकांना अपयश पचवणे कठीण असते. त्यांची मेहनत पहिल्या तीन क्रमांकाच्या तुलनेत कमी असले तरी त्यात अनेक वेळा फारच थोडा फरक असल्याचे आढळून येते. म्हणूनच अशा खेळाडूंना प्रोत्साहित करून त्यांची कामगिरी पुढील स्पर्धात उंचावण्यासाठी त्यांना उत्तेजन देणे महत्त्वाचे आहे असे क्रीडावेध अध्यक्ष श्री मनोज कोटक यांचे मत आहे.
अशा उदयनमुख खेळाडूंसह क्रीडा क्षेत्रातील दीर्घ योगदानाची दखल न घेतलेले संघटक, प्रशिक्षक यांचाही यथोचित सन्मान करून क्रीडा चळवळीचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न क्रीडावेध तर्फे केल्यास कदाचित पुढील तीन किंवा चार वर्षात बृहन्मुंबई विभागाच्या क्रीडा कामगिरीचा आलेख उंचावेल असे म्हणणे उचित ठरेल.
दिनांक 29 ऑगस्ट 2024 या राष्ट्रीय क्रीडा दिन तसेच हॉकीचे जादूगार स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिनांचे अवचित्य साधून क्रीडावेध पुरस्कार योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष याने क्रीडावेध समितीची स्थापना केली.
क्रीडावेध उद्दिष्टांमध्ये नवोदित खेळाडू याना प्रोत्साहनात्मक योजना व क्रीडा समस्या निवारणासाठी धोरणात्मक नियोजन करण्यात येणार आहे. त्या नुसार निवडक खेळाचे दोन प्रतिनिधी याना निमंत्रित करून क्रीडावेध समितीची स्थापना करण्यात आली.
सुरुवातीला कबड्डी खो-खो मल्लखांब जिम्नास्टिक, मुंबई महानगरपालिका क्रिडा विभाग, पावर लिफ्टीग, बॉडी बिल्डिंग, कुस्ती, बॉक्सिंग, फेंसिंग, थ्रोबॉल, जुडो, टायकोंडो या निवडक खेळांच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणारी योजना राबविताना क्रीडा संघटक, प्रशिक्षक, क्रीडा संस्था या क्रीडा विकासामधील महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई शहर व उपनगर विभागातील दोन पुरुष व दोन महिला खेळाडू आणि प्रदीर्घ सेवा देऊनही पुरस्कारांपासून दूर असलेला ज्येष्ठ प्रशिक्षक, संघटक, कार्यकर्ता पैकी एक या निवड प्रणालीच्या आधारे पंधरा विविध खेळांच्या 90 खेळाडू व कार्यकर्ते या पहिल्या गुणगौरव सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.
सदर प्रोत्साहनात्मक पुरस्कार क्रीडावेध खेळाडू पुरस्कार तसेच क्रीडावेध ज्येष्ठ संघटक पुरस्कार या नावाने सन्मानचिन्हे व रोख रक्कम देण्यात येत आहे.
सदर सन्मान सोहळा रविवार दिनांक 9 मार्च एक 2025 रोजी युतोपिया सभागृह, टिळक नगर, चेंबूर येथे सकाळी 10.30 ते 1 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे.
माजी खासदार श्री मनोज कोटक यांच्या अध्यक्षते अंतर्गत होणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा प्रशि प्रशिक्षक तथा क्रीडा संघटक यांचा सन्मान व उदयनमुख खेळाडू यांना प्रोत्साहन व शुभेच्छा देताना क्रीडावेध समितीस अतिशय आनंद होत आहे.
क्रीडावेध समितीने दूरदृष्टीने आखलेल्या योजनांद्वारे निश्चितच बृहन्मुंबई विभागात मोठ्या प्रमाणात क्रिडा चळवळ सुरू होऊन क्रीडा विकास साध्य करण्यासाठी क्रीडावेध चे सदर सन्मान सोहळा हे पहिले पाऊल आहे.
आपणास नम्र विनंती की सदर क्रीडा वृत्त आपल्या माध्यमातून प्रसिद्ध करून क्रीडा क्षेत्रातील उदयाचे शिल्पकार यांना प्रोत्साहित करावे.
धन्यवाद
मनोज कोटक
अध्यक्ष क्रीडावेध