*शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ट्रॉम्बे परिसरात गरजूंना मोफत राशनचे वितरण…!*
—————————————-
*मुंबई :-* येथील शिवसेना शिंदे गट मुंबईच्या ट्रॉम्बे शाखेच्या वतीने व” जण सेवा हिच ईश्वर सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विध्यमाने दिपक महेश्वरी यांच्या पुढाकारणे गरजू नागरिकांना मोफत राशन वितरण करण्यात आले तर या वेळी शिवसेने च्या वतीने सदस्य नोंदणी अभियानही राबविण्यात आले.
. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणी प्रमाणे समाज सेवा, हिच ईश्वर सेवा असून गोर गरीब नागरिकांना शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याकरिता दक्षिण मध्य मुंबई विभागातील शिवसेना शिंदे गटाच्या ट्रॉम्बे शाखेच्या वतीने दिपक महेश्वरी यांच्या पुढाकारणे येथील परिसरातील गोर गरीब व गरजू नागरिकांना बुधवार दि. ५ मार्च रोजी मोफत राशन चे वाटप करण्यात आले तर यावेळी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानही राबविण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरवातीस महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास शिवसेनेचे विभाग प्रमुख अविनाश राणे महिला विभाग प्रमुख सुनिताताई वैती, शिल्पाताई रक्षे व १०० हुन अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
—————————————-
*कॅमेरामन प्रविण मागाडे सह तेजस्वी जगताप CEN News ट्रॉम्बे, मुंबई.*