शालेय विद्यार्थ्यांसाठी भाजपाचा सदैव मदतीचा हात
डोंबिवली जनसामान्यांसाथी नेहमी पुढे असलेली भारतीय जनता पार्टी ही शालेय विद्यार्थ्यांना मदत करत असते. एखादया विद्यार्थ्यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट असेल आणि त्यामुळे त्याला शिक्षण घेता येत नसेल तर अशा विद्यार्थ्यांकरता भाजपाकडून मदतीचा हात पुढे असतो. डोंबिवलीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. डोंबिवली पश्चिमकडील सखाराम कॉप्लेसजवळील जाधववाडीमधील भाजपा पदाधिकारी दिनेश जाधव, यांच्या जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी जनसंपर्क कार्यालयाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.नवीन वह्या पाहून लहान मुलांनाही आनंद झाला.गरीब विद्यार्थी जरी असला तरी त्याला आवश्यक शालेय साहित्य मिळावे हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.