संतनगरीत शेगांव येथे राजमाता जिजाऊ रथयात्रेचे उत्साहात स्वागत..
ठिकठिकाणी जिजाऊ रथयात्रेचे झाले भव्य स्वागत..
नागरिकांची लोटली अलोट गर्दी..
विखुरलेला सकल मराठा एकत्र एकसंघ आणि संघटित व्हावा, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा जोडो अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने राजमाता माँसाहेब जिजाऊ रथयात्रा निघालेली असून, ही रथयात्रा रविवार २० एप्रिल रोजी संतनगरी शेगाव येथे दाखल होणार आहे.
मराठा साम्राज्य स्वराज्य व्हावं हीच श्रींची इच्छा, या अनुषंगाने अठरा पगड जाती, धर्माच्या बहुजन समाजाने एकत्र येऊन मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होऊन जिजाऊ रथयात्रेचे स्वागत करावे आणि या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीने केले होते
या रथयात्रेचे २० एप्रिल रोजी जवळा येथून त आनंद विसावा, नागझरी रोड, तीन पुतळा परिसर, मोठे महादेव मंदिर, श्रीसंत गजानन महाराज मंदिर परिसर, लहुजी वस्ताद चौकात आगमन झाले येथें क्रांतीविर लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही रथयात्रा पुढे संत गाडगे बाबा चौक, डॉ. बाबासाहेब अंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री अग्रसेन चौक, रेल्वे स्टेशन विश्रामगृह येथे पोहचली असता या ठिकाणी यात्रेचे उत्साहत स्वागत करण्यात आले पुढे ही रथ यात्रा जगदंबा चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, डॉ. पंजाबराव देशमुख चौक (वाटिका), राजमाता जिजाऊ चौक आणि माऊली कॉलेजकडे प्रस्थान करत खांमगावी रवाना झाली या मराठा जोडो अभियानात आपल्या संतनगरीतील मराठा बांधवांनी सहभागी होऊन नव्या पिढीला आपल्या इतिहासासोबत जोडून दिशा द्दिली आणि पुन्हा एकदा स्वराज्यातील सकल मराठा रयतेने एकत्र येत एक साथ मराठा उभा राहून जिजाऊंना मानवंदना करत त्यांनी पाहिलेल्या स्वराज्याच्या स्वप्नांना, शिवरायांनी, शंभू महाराजांनी घडविलेल्या स्वराज्याला मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहिले
====================.
जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा
Cen. news