चेंबूर मध्ये रिक्षा चालकाचा मुलगा झाला एमपीएससी परीक्षा पास
चेंबूर खारदेव नगर घाटला येथील रिक्षा चालक सुदाम मोटे कष्टमय जीवन जगत आपल्या मुलांना शिक्षण दिले. कुमार विनायक सुदाम मोटे एमपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर संपूर्ण विभागात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे . एमपीएससी परीक्षा पास झाल्याबद्दल त्याचे कौतुक करताना मा.बेस्ट समिती अध्यक्ष.मा.नगरसेवक,श्री.अनिलपाटणकर, चेंबूर नागरिक सहकारी बँक संचालक सौ. मीनाक्षी अनिल पाटणकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र नगराळे, महिला उपविभाग संघटिका सुलभा पत्त्याने , महिला चेंबूर विधानसभा सह समन्वयक सौ. अनिता महाडिक,चेंबूर विधानसभा समन्वयक श्री संदीप गुरव, महिला शाखा संघटिका सौ. योगिता म्हात्रे , चंद्रकांत डोळसे, शशिकांत आयवळे,वैशाली कदम, सुनिता कापसे, बबीता राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते. या अगोदर विनायक नरळे यांनी देखील झोपडपट्टी मध्ये राहून स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले होते.
विनायक मोटे यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल संपूर्ण विभागातून कौतुकाचा वर्षा होत आहे. तसेच इतर झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना देखील त्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे.