दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मूर्तिजापूरात सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर..!
शेकडो कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात केले निदर्शने..
विविध संताप घोषणा देऊन केला दहशतवाद्यांचा निषेध
—————————————-
मूर्तिजापूर :- ” जम्मू काश्मीर च्या पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात तब्बल 27 पर्यटक ठार झाले असून, धर्म विचारून आणि गोळ्या झाडून हे अमानुष हत्याकांड करण्यात आले आहे.
मी अत्यंत तीव्र शब्दात सांगतो, ज्यांनी हल्ला केला, त्यांना कल्पनेपेक्षा जास्त शिक्षा मिळायला हवी. दहशतवाद्यांची उरली सुरली जमीन मातीमोल करू, प्रत्येक दहशतवाद्यांना कठोरात कठोर, कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा या निर्दयी नपुसक दहशतवाद्यांना व त्यांना पडद्या मागे सहकार्य करणाऱ्यांना भारताने दिली पाहिजे” अश्या तीव्र शब्दात मूर्तिजापूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने वेळी जेष्ठ पत्रकार प्रा. दिपक जोशी बोलत होते.
मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सकल हिंदू समाजा च्या वतीने जम्मू काश्मीर च्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली. या भीषण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
. काश्मीरच्या पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया देशभरात येत आहेत. महाराष्ट्रातले सहा पर्यटक या हल्ल्यात मारले गेले. डोंबिवलीतले तीन जण हल्ल्यात मारले गेले आहेत. याचा निषेध म्हणून गुरवार दि. २४ रोजी सकल हिंदू समाज मूर्तिजापूर च्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. तदनंतर मुख्य रस्त्यावर दहशदवादी हल्ल्याच्या निषेदार्थ “भारत माता की, जय, वंदे-मातरम, हिंदुस्थान – जिंदाबाद, पाकिस्तान
-मुर्दाबाद ” च्या तीव्र संतप्त घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी सकल हिंदू समाजाच्या व्यतिरिक्त, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय विध्यार्थी परिषद,व्यापारी संघ, भारतीय जनता पार्टी, पत्रकार पत्रकार संघ, विविध सामाजिक संस्थाचे शेकडो पदाधिकारी तथा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर -अकोला.