चेंबूर पोलीस स्टेशनचे राजेंद्र घोरपडे यांची सहाय्यक उपनिरीक्षकपदी पदोन्नती, पोलीस उपायुक्तांकडून अभिनंदन!
मुंबई – चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या दक्ष आणि जबाबदार पोलिस कर्मचारी राजेंद्र घोरपडे यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे सहाय्यक उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. परिमंडळ – ६ चे डॅशिंग पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी गुरुवारपासून ते सहाय्यक उपनिरीक्षक म्ह
णून कार्यरत राहतील, अशी माहिती दिली आहे.
माहितीनुसार, चेंबूर पोलीस स्टेशन, गोवंडी, आणि पुन्हा चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या राजेंद्र घोरपडे यांनी आपल्या कार्यकुशलतेमुळे परिमंडळात विशेष ओळख निर्माण केली आहे. पोलिस सेवेसोबतच ते एक नामांकित समाजसेवक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. समाजसेवेची आवड जोपासत घोरपडे आपल्या परिसरात विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. पोलिस स्टेशनमध्येही ते नेहमी तत्पर राहून काम करतात. त्यांच्या विशेष कामगिरीमुळे त्यांना अपेक्षेपेक्षा लवकर बढती मिळाल्याचे समजते.
दिनांक ०२/०१/२०२५ रोजी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी राजेंद्र घोरपडे यांच्या वर्दीवर स्टार लावून त्यांना सन्मानित केले व त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. घोरपडे यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.