जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु, रेल्वेची चौकशी सुरु..!
—————————————-
जळगाव :- लखनऊ ते मुंबई धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला जळगावातील पाचोरा तालुक्यातील परधाडे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे.या अपघातात समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या चाकाखाली प्रवासी चिरडले. या अपघात ११ प्रवाशांचा बळी गेला आहे. या प्रकरणात पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांखालून धुर आल्याने आग लागल्याची अफवा पसरल्याचे म्हटले जात आहे. परधाडे ते दुसाणे स्थानकादरम्यान हा अपघात झाला आहे. या प्रकरणात दहा हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील चार जणांची प्रकृती नाजूक आहे जळगावचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. चार मृतदेह जळगावाच्या दिशेने नेले आहेत तर चार मृतदेह पाचोऱ्याच्या दिशेने नेले आहेत. जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे तर काहींना वृंदावन या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरु झाले आहे. तर घटनास्थळी रेल्वे प्रशासनासह जिल्हा प्रशासन दाखल झाले असून मंत्री गिरीश महाजन यांनी ही घटना स्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला तर याबाबत रेल्वे प्रशासनाच्या वतीने मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील निला यांनी दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News जळगाव.