केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मूर्तीजापुरात निषेध..!
अकोला जिल्यातील मूर्तिजापूर वंचित बहुजन आघाडी तालुका शाखेच्या वतीने अहिंसा चौक येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे संसद अस्तित्वात आली त्यामुळेच मंत्री होता आले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आकसबुद्धीने वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करत शहा यांच्या प्रतिमांना जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील सरदार माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक महिला आघाडी अध्यक्ष लक्ष्मीवानखडे, प्रधान गुरुजी,अजय सुखदेवे, अक्षय राऊत बाळासाहेब ठोकळ, सतीश खंडारे,सतिष गवइ.उपस्थित होते .
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.