प्रेस नोट 17
दिनांक 16/09/2024
गणेश विसर्जन व ईद ए मिलादच्या अनुषंगाने परिमंडळ 6 मध्ये पोलीस संचलन केलेबाबत…
दिनांक 17/09/2024 रोजी होणारे गणेश विसर्जन व दिनांक 18/09/2024 रोजी ईद ए मिलाए या महत्वपूर्ण बंदोबस्ताचे पूर्वतयारीच्या अनुषंगाने दिनांक 15/09/2024 रोजी 19ः15 वा. ते 22ः45 वाजेपर्यंत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6, मुंबई अधिनस्त असलेल्या 10 पोलीस ठाणे मध्ये पोलीस वाहनाद्वारे संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर पोलीस संचलनामध्ये पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6, चेंबूर, नेहरूनगर, ट्राॅम्बे, देवनार विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 4 एसआरपीएफ स्ट्रायकिंग फोर्सस् व पोलीस ठाण्याच्या मोबाईल व्हॅनस्, बीट मार्शलस् यांचा समावेश होता. साडेतीन तासामध्ये साधारण 33 किलोमीटर परिसरामध्ये 22 वाहनांद्वारे संचलन करण्यात आले.
या संचलनामार्फत कायदयाचे पालन करणा-या व्यक्तींसोबत मुंबई पोलीस दल असून कायदयाचे उल्लंघन करणा-यावर वचक निर्माण करत ‘‘ सदरक्षणाय् खलनिग्रहणाय ’’ या पोलीस दलाच्या बोधवाक्याची प्रचिती घडवून आणण्यात आली. तसेच नागरिकांना उत्सवादरम्यान सहकार्य करण्याचे, संशयित व्यक्तींची, वस्तूंची माहिती पोलीसांना देण्याची तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व अफवा न पसरवण्याचे आवाहन श्री. हेमराजसिंह राजपूत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6, मुंबई यांचेमार्फत करण्यात आले.
येणारे गणेश विसर्जन व ईद ए मिलाद हे महत्त्वाचे सण शांततामय व सुरक्षित वातावरणात पार पाडण्याकरीता 2 पोलीस उप आयुक्त, 4 सहायक पोलीस आयुक्त, 300 पोलीस अधिकारी व 2100 पोलीस अंमलदारांसहित स्ट्रायकिंग फोर्सेस्, कायदा व सुव्यवस्था वाहने, मोबाईल वाहने, बीट मार्शलस् सुसज्ज आहेत. तसेच परिमंडळ 6 अंतर्गत कलम 163(2) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये एकुण 1126 उपद्रवी इसमांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
———————-