आमदार दिलीप लांडे यांच्या उपस्थितीत प्रयाग लांडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
मुंबई,:- चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आमदार दिलीप लांडे यांचे धाकटे चिरंजीव व युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य प्रयाग लांडे यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रयाग लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुर्ला काजूपाडा येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात वाढदिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार दिलीप लांडे यांनी उपस्थित राहून प्रयागला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार व्यक्त करत मार्गदर्शन केले. लांडे म्हणाले की चांदिवलीचा विकास करने हाच माझा उद्देश असून गेल्या 20 वर्षात जी कामे झाली नव्हती ती कामे
ह्या पाच वर्षात जनतेच्या आशीर्वादाने मी केली आहेत. माझा मुलगा प्रयागचा आज वाढदिवस त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने आलात मी आपला आभारी आहे.
जनतेची सेवा करणे हे माझ्या रक्तात आहे – प्रयाग लांडे
गेली पाच वर्ष चांदिवली विभागात मी लोकांमध्ये फिरत आहे. लांडे मामांचा मुलगा म्हणून लोकांनी डोळे बंद करून मला आशीर्वाद दिला असून मामा प्रमाणेच जनसेवा करण्याचा माझा उद्देश आहे. जनतेची सेवा करणे हे माझ्या रक्तात आहे. सदैव जन सेवेसाठी हजर राहीन आणि विभागातील लोकांची सेवा मला घडो असे मनोगत युवासेनेचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य प्रयाग लांडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायसमोर केले.