एक देवाभाऊ एक दाढी भाऊ अन् तिसरा जॅकेट भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ; उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी..!
—————————————-
अमरावती / दर्यापूर :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये प्रचार सभांचा धुराळा उडाला आहे. प्रचारासाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. दिल्लीतील नेते देखील महाराष्ट्रामध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. उद्धव ठाकरेंच्या या वचननाम्यामध्ये निवडणून आल्यानंतर अनेक प्रकल्पांना मंजूरी देणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांची दर्यापूरमध्ये जाहीर सभा पार पडत आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीमध्ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आला. उद्धव ठाकरे यांनी गजानन लवटे यांना उमेदवारी दिली आहे. दर्यापूर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, यंदाची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही, तर महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे. आपण सगळेजण महाराष्ट्र प्रेमी म्हणून एकवटलो आहोत आणि पलिकडे महाराष्ट्र द्रोही आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. हे देखील वाचा : मुंडे भाऊ बहिणींवर गंभीर आरोप; जमीन लाटल्याचा सारंगी महाजनांचा दावा पुढे ते म्हणाले की, “मी त्यांना महाराष्ट्र द्रोही यासाठी म्हणतो की, त्यांनी आपलं चांगलं चाललेल सरकार गद्दारी करुन पाडलं. गद्दारी ही महाराष्ट्राच्या रक्तामध्ये नाही पण ह्यांच्या रक्तामध्ये आहे. म्हणून ते महाराष्ट्र द्रोही आहे. महाराष्ट्रचे जे काही हक्काचं आहे ते ओरबाडून गुजरातला नेत आहेत. मग हे महाराष्ट्र प्रेमी कसे असू शकतात. म्हणून मी मैदानात उतरलो आहे. मला अभिमान आहे या गोष्टीचा की महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही. जे आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं करतो आहे,” असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले. हे देखील वाचा : घरात बसून कारभाराची सवय गेली नाही…; मातोश्रीवरुन जाहीर झालेल्या वचननाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा पुढे ते म्हणाले की, “आपल्या पुढचे आव्हान अजून संपलेले नाही. आपण महाराष्ट्राने लोकसभेला दाखवून दिलंच आहेच. माजलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बुडाखाली ठिणगी महाराष्ट्राने पेटवली. गेली 10 वर्षे आपण त्यांच्यासोबत होतो. 40 च्यावर खासदार आले, अजून काय द्यायचं बाकी होतं. खासदार दिले…आमदार दिले…वरची सत्ता दिली…खालची सत्ता दिली…तर त्यांच्या डोक्यात हवा दिली. मग हवा काढायला नको. हे जनतेच्या जीवावर गॅसचे फुगे वरवर जायला लागले. टाचणी मारली तर आला फुगा खाली. आता पुन्हा एकदा करुन दाखवायचे आहे. मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आणि इतर निर्णय घेतले ते अहंकाराने येऊन सांगितलं नाही. कारण ते माझं कर्तत्व होतं. मी कधी हे मिरवून सांगितलं नाही. आज ज्यांचं हे सुरु आहे हे सगळे भाऊ. एक देवाभाऊ..एक दाढी भाऊ अन् तिसरा जॅकेट भाऊ…यांच्यामध्ये भाऊबंदकी एवढी झाली आहे. पण एका बाबत यांची एकी झाली आहे. आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. आता निवडणुकीमुळे यांना बहीणींवर प्रेम आलं आहे. पण महिलांच्या सुरक्षेचे काय?” असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी जोरदार दर्यापूरमध्ये प्रचारसभेमध्ये टीका केली आहे.
—————————————-
कॅमेरामन शाम वाळस्कर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुऱ्हेकर, CEN News दर्यापूर -अमरावती.