राष्ट्रीय महामार्गांवर कारची दुचाकीस धडक, दुचाकीस्वार जागीच ठार..!
—————————————-
घटनास्थळी विर भगतसिंग आपत्कालीन पथकाचे मदत कार्य..
—————————————-
अकोला :- जिल्ह्यातील मूर्तिजापूर नजिक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर एकाच दिवशी दोन विविध अपघात घडल्याची घटना घडलीये. या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर डाळबी -कोळंबी नजिक पहाटेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुसाट वेगाने जाणाऱ्या आयशर गाडी ने अचानक पलटी घेतल्याची घटना ताजी असतांनाच त्याच ठिकाणी आज शुक्रवार दि २७ रोजी दुपारी ४ वाजताच्या च्या सुमारास मूर्तिजापूर वरून अकोला च्या दिशेने जात असलेल्या दूचाकी क्रमांक एम. एच. २८ बी. सी ८४८२ ला मागून सुसाट वेगाने येत असलेल्या चारचाकी कार क्रमांक एम. एच २८ ५९८७ ने जबर धडक दिल्याने शेगाव येथील शकील नामक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे तर या अपघातात शकील या दुचाकीस्वारा सोबत असलेल्या त्याच्या सहकार्यास गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले असून शकील हा शेगाव वरून सोनोरी येथे असलेल्या मदरशेत शिकत असलेल्या नातेवाईकास भेटण्याकरिता आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कुरनखेड येथील विर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाच्या सदस्यांनी धाव घेत जखमी ला तातडीने अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सतीश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात बोरगाव पोलीस करीत आहेत.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला.