मूर्तिजापूर शहर पोलीसांनी दिले चार गोवंशाना जीवदान..!
—————————————-
हिवाळी अधिवेशनात आ. हरिष पिंपळे नी उचललेल्या प्रश्नावरून पोलीस ऍक्शन मोडवर
—————————————-
अकोला:- नुकत्याच नागपूर येथे संपन्न झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघांचे आमदार हरिष पिंपळे यांनी गोवंश हत्या बंदी कायदा अधिक कडक करून त्यावर निर्बंध लावण्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्यावर अखेर मूर्तिजापूर शहर पोलीस ऍक्शन मोडवर आले असून गोवंशाची कत्तल करणाऱ्यां विरोधात कंबर कसली असल्याचे नुकत्याच शहरातील जुनी वस्ती परिसरातील रोशनपुरा येथे झालेल्या कारवाई वरून दिसून येत आहे.
मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या परीक्षेत्रातील जुनिवस्ती रोशनपुरा परिसरात एका ठिकाणी ५० वर्षीय व्यक्तीने चार गोवंशांना कत्तली साठी बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक अजित जाधव यांना मिळताच पोलिसांनी एक ऑपरेशन राबवित घटनास्थळ गाठून कारवाई करत निर्दयतेने कत्तली साठी बांधून ठेवलेल्या चार गोवंशांना जीवदान दिले.
मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन परीक्षेत्रात जुनिवस्ती परिसरात रोशनपुरा येथील अब्दुल जब्बार अब्दुल शहीद वय ५० वर्ष ह्याने आपल्या गोठ्यात १ लाख ५ हजार किंमती च्या कत्तली साठी चार गोवंश निर्दयतेने बांधून ठेवल्याची खात्रीदायक गोपनीय माहिती पोलिसांना मिळतातच पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या यांच्या चाणख्य युक्तीतून पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी तत्परता दाखवीत घटनास्थळी जाऊन निर्दयतेने बांधून ठेवलेल्या गोठ्यातील चार गोवंशांना जीवनदान देत आरोपी अब्दुल जब्बार अब्दुल शहीद याच्या वर कलम ५, ५(अ), ५(४) महा ९, ९(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सुधारणा आदिनियम २०१५ च्या कलम ११ प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध सहकलम ११९ या कलमान्वये पुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले पुढील तपास मुर्तीजापुर शहर पोलीस चे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत.
—————————————
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News, मूर्तिजापूर -अकोला.