मूर्तिजापूर बस स्थानकावरून तीन संशयित महिला अटकेत, शहर पोलिसांची कारवाई
मूर्तिजापूर बस स्थाणका वरून तिन संसयित महिला आरोपिंना घेतले शहर पोलिसांनी ताब्यात…!
मूर्तिजापूर :- येथील बस स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांचे पाकीट मार, चेन स्नेचीन चे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. या अनुषंगाने शहर पोलीसांनी कंबर कसत आरोपिंच्या शोधात असतांना आज दि. २ एप्रिल रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशन च्या डिबी पथकाने दुपारी ११. ३० ते १२ वाजताच्या सुमारास तिन संशयित महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून अधिक काही गुन्ह्यांची माहिती मिळते का याची कसून चौकशी मूर्तिजापूर शहर पोलीस करीत असून नेमक वृत्त लिहेस्तोर तिन्ही संशयित महिला आरोपिंवर गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. मात्र बस स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या चोरी च्या घटने मध्ये या महिलांचा समावेश असण्याची शक्यता मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक अजित जाधव यांच्या कडून दिल्या जात आहे.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर -अकोला