मूर्तिजापूरात ” बाप्पाला ” उत्साहपूर्ण अन् शातंतामय वातावरणात निरोप…!
मूर्तिजापूर – येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सांगता जल्लोषात करण्यात आली आहे. मूर्तिजापूर येथील जुनी वस्तीतील वैभवशाली पंरपरा असणाऱ्या हजारी मठ गणेशोत्सवाची मंगळवार दि. १७ रोजी पारंपारिक पद्धतीने सांगता करण्यात आली. मंगळवारी सकाळपासूनच गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सुरूवात झाली करण्यात आली. गुलालाची उधळण, भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या अन् फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव मूर्तिजापूरातील प्रत्येक चौका-चौकात बाप्पावर केला जात असल्याचे पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात तरूणाई पारंपारिक वेशात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतांना दिसत होते. तर चंद्रशेखर आझाद आखाडा गणेश उत्सव मंडळात राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडत असलेल्या निषेधार्थ फलकाचे प्रदर्शन करण्यात आले. मस्जीद जवळ मिरवणूक पोहताच त्याठिकाणी आरती करण्यात आली.यावेळी जुनी वस्तीतील मस्जित समोरून बाप्पाची मिरवणूक जाता असतांना उपविभागीय अधिकारी संदिपकुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, नायब तहसीलदार उमेश बन्सोड, रविंद्र राऊत शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक अजित जाधव, मुख्याधिकारी एस. एस. टाले यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यासाठी मूर्तिजापूरकरानीं मोठी गर्दी केल्याचे दिसत होते. अशातच लाडक्या आणि मानाच्या हजारी मठ गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजून ३४ मिनिटांनी हजारी मठ गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी गणेश भाविकांनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी या… अशा जयघोषात बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन केले.
———————————
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News, मूर्तिजापूर -अकोला.