मुंबई, वानखेडे मैदान
मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित #वानखेडे मैदान येथील स्टॅन्डस्चा नामकरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी शरद पवार, भारताचा कर्णधार रोहित शर्मा, दिवंगत अजित वाडेकर, अमोल काळे यांच्या नावांच्या स्टँडस्चे नामकरण करण्यात आले.
आज क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडेवरील स्टॅन्ड्सला जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचे नाव देण्यात येत असल्याचा अभिमान आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक लाख क्षमतेचे भव्य क्रिकेट मैदान उभारावे. तसा प्रस्ताव दिल्यास जागा उपलब्धतेसह सर्व सहकार्य करु.
रोहित शर्मा हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. पाठोपाठ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्याने भारतासाठी जिंकून इतिहास रचला आहे. एखादा खेळाडू खेळत असतानाच त्याचे नाव मैदनातील स्टॅन्डला देण्याचा हा वानखेडेच्या इतिहासतील पहिलाच क्षण आहे.
शरद पवार यांचे क्रिकेटमधील योगदान मोठे आहे. देशातील क्रिकेटची उंची वाढवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. भारतीय क्रिकेटचा विकास करणाऱ्या प्रशासकांमध्ये शरद पवार हे अग्रेसर असल्यामुळे त्यांचे नाव वानखेडे मैदानावरील स्टॅन्डला देणे योग्यच आहे.
अजित वाडेकर यांनी परदेशात जिंकण्याची सवय भारतीय क्रिकेटला लावली. १९७१ मध्ये पहिल्यांदा वेस्ट इंडिज आणि इंग्लंड अशा दोन्ही देशांसोबत मालिका जिंकून त्यांनी इतिहास रचला. आज त्यांच्या नावाच्या स्टॅन्डचे अनावरण होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.
अमोल काळे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये असताना कमी कालावधीमध्ये फार मोठे काम केले आहे. क्रिकेटसाठी उत्तम ते सर्व करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांनी क्रिकेटसाठी पाहिलेले स्वप्न मुंबई #क्रिकेट असोसिएशन नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास आहे – मुख्यमंत्री