मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे ई-उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. सावरकरांच्या १४२ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त जहाँगीर दीक्षांत सभागृहात विशेष व्याख्यान झाले.
कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्यासह आमदार अतुल भातखळकर, पराग अळवणी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरु अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर मुंबई विद्यापीठाचे स्नातक होते त्यांच्या जीवन आणि कार्याला समर्पित अभ्यास आणि संशोधन केंद्र दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारे अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करण्याचे प्रयत्न व्हावे – राज्यपाल
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून सावरकरांचा जीवनप्रवास उलगडेल. त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर समग्र संशोधन करता येईल. त्यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात स्थापन संशोधन केंद्रास आवश्यक निधी दिला जाईल – मुख्यमंत्री