मुंबई -अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या डब्यांच्या रचणेत वाढ..!
मुंबई :- रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस गाडीमध्ये एक अतिरिक्त वातानुकूलित-द्वितीय श्रेणीचा डबा आणि एक अतिरिक्त शयनयान डबा कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस १० फेब्रुवारीपासून अमरावती तर ११ फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सदर गाडीची सुधारित संरचना करण्यात आली आहे. १- प्रथम वातानुकूलित कम वातानुकूलित-द्वितीय, ३ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लाससह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन, आणि १ जनरेटर कार, असे एकूण गाडीच्या संरचनेत आता २२ डबे असतील, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक
प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याची खात्री रेल्वे प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आलीये.
—————————————-
प्रतिनिधी तेजस्वी जगताप, CEN News, मुंबई.