दिव्यांग पणावर मात करण्यासाठी दिव्यांगाना कार्यक्रमात सहभागी होण्याच्या संधी द्या – कुं.अनिता इंगळे
—————————————-
अकोला /मूर्तिजापूर :- समाजात वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग असून त्यांच्यात अनेक प्रकारच्या कला दडलेल्या आहेत त्या कलांगुणांना वाव मिळावा आणि दिव्यांग पणावर मात करण्यासाठी दिव्यांगाना कार्यक्रमात सहभागी होण्याच्या संधी दिल्या पाहीजे असे प्रतिपादन गट समुह साधन केंद्रांच्या समावेशक तज्ञ कुं.अनिता इंगळे ह्यांनी जागतीक दिव्यांग दिनी पुंडलिक नगर ( सिरसो ) येथील श्री संत गुणवंत महाराज मतीमंद विद्यालय व स्व.एम.एस. निवासी मुकबधीर विद्यालय मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतीक दिव्यांग दिन कार्यक्रमात बोलत होत्या.पुढे बोलताना – जागतिक दिव्यांग दिन हा एक दिवसाचा साजरा न करता नेहमी साजरा केल्यास दिव्यांगाप्रती त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्या भावना जागरूक होऊन सामान्य नागरिकाप्रमाणे यशस्वीतेकडे वाटचाल करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शासकीय सेवेत कार्यरत असताना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये ४०० च्या वर विद्यार्थी हे दिव्यांगांमध्ये आहेत त्यांच्यासोबत काम करत असताना आणि इथल्या कार्यक्रमात येऊन या मुलांमधली कला पाहता मन प्रसन्न झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते ॲड अविन अग्रवाल, प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक बंटी मालानी, सामाजिक कार्यकर्ते कैलास महाजन, डॉ.खोकले ,शुद्धोधन खंडारे, जय ग्याने, चिन्नू अव्वलवार, माजी सैनिक बाबूलाल गवई मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजनाने करण्यात आली. ॲड अविन अग्रवाल व बंटी मालाणी यांच्या हस्ते विद्यार्थांना स्वेटर आणि स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांनी केले.
यावेळी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे कर्मचारी/ शिक्षकवृंद ऋषिकेश खांडेकर बाळासाहेब टोबरे ,इलियास ,अनिल सिरसाट , रितेश खांडेकर ,सचिन वाडेकर,कमलेश नवले ,अस्मिता गवई,कोमल खांडेकर ,कविता कोकाटे, सुजाता वाघमारे ,डोंगरे ताई इत्यादींनी परिश्रम घेतले.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर -अकोला.