शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर..!
* नगर परिषदे चे दुर्लक्ष : मोकाट जनावरांचा वाली कोण हा प्रश्नच..?
* रस्त्यावरील मोकाट जनावरे देतात अपघातास निमंत्रण.
___________
मूर्तिजापूर :- शहरात सर्वत्र रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार आढळतो. रस्तोरस्ती जनावरे कधी कळपाने तर कधी एकटीदुकटी फिरत असतात. शहरातील रस्त्यांवर आधीच अतिक्रमण असल्याने जनावरांचा संचार अपघातास निमंत्रण देत आहे. असे असतानाही नगर परिषद
प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल कारणे गरजेचे आहे. तसे केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो. पण मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आणि जनावरांना पकडल्यास
त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने
नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज
चौक ते टांगा चौक हा शहरातील मुख्य मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन ते चिखली रोड,
,बसस्थानक ते कारंजा रोड, उषाताई तिडके कॉम्पलेक्स समोरील मुख्य रहदारीच्या मार्गांवर दिवसभर मोकाट जनावरे फिरत असतात. दुभाजकांवर उभे राहणे, दुभाजकांनाच रेटून बसणे, रस्त्यांच्या मधोमध उभे राहणे असे प्रकार जनावरे करीत असतात. शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यातच अतिक्रमणही वाढले झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील जनावरांचा संचार वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. जनावरे अन्नाच्या शोधात हातगाड्यांजवळ जातात. हातगाडीचालकांनी हकलताच जनावरे रस्त्यावर सैरावैरा पळतात. त्यातच
मोठी वाहनेही कर्णकर्कश्य आवाजात हॉर्न वाजवून
जनावरांना दूर सारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गोंधळलेली जनावरे कधी वाहनांवर जाऊन धडकतात
तर कधी रस्त्याच्या मधोमधच उभी राहतात. अश्यावेळी
वाहनचालकांना वाट काढणे कठीण जाते. शहरातील
मुख्य मार्ग लहान दुभाजकांनी विभागला गेला आहे. वाहनचालक रस्ता ओलांडताना जनावरे तेथे उभी असल्यास वाहने एकमेकांवर आदळतात. हा सर्व प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे ठरत आहे. या गंभीर्या कडे नगर परिषद प्रशासनाने जातीने लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा व संबंधित जनावर मालकावर दांडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरातून सर्वदुरून होत आहे.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN NEWS अकोला.