शालेय शिक्षण राज्यमंत्री पकंज भोयर यांनी दिली परीक्षा केंद्रावर भेट
राज्याचे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगाव येथील स्वर्गीय मस्कुजी बिरुजी बुरुंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अचानकपणे त्यांनी भेट देऊन सुरू असलेल्या परीक्षेची पाहणी केली. भोयर हे शेगाव येथील सहकार विभागाने आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी हजर झाले असता त्यांनी ही आकस्मिक भेट दिली.
भोयर यांनी यावेळी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियाना संदर्भात माध्यमांची बोलताना माहिती दिली.
बाईट : पंकज भोयर (शालेय शिक्षण राज्यमंत्री)
—————————————-
प्रतिनिधी इस्माईल शेख, CEN News शेगाव -बुलढाणा