माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतींची बोगस स्वाक्षरी करून संस्था बळकवण्याचा प्रकार…!
विदर्भ वैभव मंदिर न्यास संस्थेतील प्रकार आला समोर
—————————————-
दादर :- येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास संस्थेतील एका पदाधिकाऱ्याने बनावट स्वाक्षरी करून संस्थेत आर्थिक गैरव्यवहार करून विश्वस्थांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेत गेल्या काही वर्षांपासून येथील अध्यक्षान सह इतर संस्थेतील विश्वस्थ्यांना अंधारात ठेऊन संस्थेतील गजानन देविदास नागे या सदस्याने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संस्था बळकवण्याचा प्रकार व आर्थिक गैरव्यवहार केल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. सदर प्रकरणात ट्रस्ट च्या इतर विश्वस्थ्यांनी धर्मादाय आयुक्त वरळी, मुंबई यांच्या कडे रीतसर तक्रार पुरव्यांसह नोंदविण्यात आली असल्याचे माहीम विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार महेश बळीराम सावंत यांनी धर्मादाय आयुक्त यांच्या कडे दिलेल्या पत्रावरून स्पष्ट होत आहे.
पत्रात उल्लेख केलेल्या नुसार माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत हे विदर्भ वैभव मंदिर न्यास दादर या संस्थेचे विश्वस्थ असून त्यांनी संस्थेचे या पूर्वी अध्यक्ष पदही भूषविले आहे. तर त्यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून गजानन देविदास नागे या सदस्याने सदर संस्था ही बळकवण्याचा कट रचित स्वतःच्या स्वार्थाकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर येत आहे.
विशेष म्हणजे गजानन नागे या सदस्याने स्वतः ची वैयक्तिक सिक्युरिटी एजन्सी ही स्थापन करून अनेक वर्षा पासून संस्थेच्या बँक अकाउंट मधून कित्येक वेळा वेगवेगळे बिल ही पास करवून घेतले आहेत. याची प्रत आमच्या प्रतिनिधींच्या हाती आली असून याचे सर्व पुरावे ही समोर आले आहे.
नियमानुसार संस्थेचा कुठलाही पदाधिकारी संस्थेमध्ये आर्थिक लाभ घेऊ शकत नाही अशा प्रकारचे निकष धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे नियमचं नेमलेले असतांना सुद्धा सर्व नियम धाब्याब्यावर बसवीत गजानन नागे या सदस्याने अनेक वर्षांपासून आपल्या स्वतः च्या सेक्युरिटी एजन्सी बेकायदेशीर रित्या चालवीत असून एव्हडेच नव्हे तर या महोदयांचे मन न भरल्याने याने चक्क आपल्या धर्मपत्नीस ही सदर संस्थेत नियुक्त केल्याने “हम करे सो कायदा ” अशा प्रकारे स्वतःच्या च मर्जीने इतर सदस्यांना अंधारात ठेवीत बदनाम करण्याचे कट रचित असल्याचे संस्थेच्या मूळ विश्वस्थ्यांना (शेड्युल १) जे सदस्य धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदणीत आहेत अशा विश्वस्थ्यांना संस्थे बाहेर ठेऊन स्वतः च स्वतःला सरचिटणीस पद भूषवून कुठल्याही मूळ विश्वस्थ्यांना विश्वासात न घेता ठराव घेत असल्याचे समोर आले असून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत हे ही एक मूळ व जेष्ठ विश्वस्त होते त्यांच्या निधना नंतर गजानन नागे याने बोगस स्वाक्षरी व बोगस ठराव तैयार करून एका प्रकारे संस्थेची व धर्मदाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक केल्याचे समजते.
या गंभीर्याचे धर्मादाय आयुक्त काय दखल घेतात व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना काय न्याय देऊन दोषींवर काय कारवाई करतात या कडे लक्ष लागले आहे.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर ,CEN News दादर -मुंबई.