शिक्षकांच्या तक्रार निवारणार्थ महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचा जळगाव शिक्षणाधिकारी कार्यालय येथे शिक्षक दरबार संपन्न….
जळगाव दि.२८/४
जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्या व तक्रारी सोडवण्यासाठी आज जळगाव शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांचे कार्यालयात महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक दरबार घेण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील शिक्षकांच्या तक्रारी व समस्या सोडवण्यासाठी जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण मॅडम तसेच प्राथमिक चे शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील साहेब तसेच उपशिक्षणाधिकारी पठाण साहेब, उप शिक्षणअधिकारी शेख साहेब, वेतन अधीक्षक तडवी साहेब तसेच शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जळगाव जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक , मुख्याध्यापक व संस्थाचालक उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या विविध तक्रारी क्रमाक्रमाने एका मागून एक वाचन करण्यात आले व जागेवरच शिक्षणाधिकारी यांनी शक्य तेवढ्या तक्रारींची निरसन केले. यामध्ये प्रामुख्याने
1) अतिरिक्त शिक्षकांचे जोपर्यंत दुसऱ्या शाळेत समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांचे पगार मूळ आस्थापनेच्या शाळेवरच करण्यात यावे याविषयी पत्र काढण्याचे सांगितले.
2) शिक्षकांची थकीत असलेली फरक बिले लवकरात लवकर काढणे
3) सेवा जेष्ठता यादीप्रमाणे नियुक्त्या करण्यात याव्या.
4) शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्यात यावे.
5) संच मान्यतेतील घोळ लवकरात लवकर मिटवावा.
यासह अनेक महत्त्वाच्या तक्रारींचे निरसन करण्यात आले. व राहिलेल्या तक्रारींबाबत लवकरात लवकर निरसन करण्यात येण्याचे आश्वासन दोन्हीही शिक्षणाधिकारी यांनी यावेळी दिले.
यावेळी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचे जळगाव जिल्हा माध्यमिक जिल्हाध्यक्ष श्री घनश्याम निळे , प्राथमिक जिल्हा अध्यक्ष राजेश जाधव , माध्यमिक उप जिल्हाध्यक्ष विजयानंद शिंदे यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील अनेक शिक्षकांच्या समस्या व तक्रारी यावेळी जागेवर सोडवण्यात आल्याने व संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांसाठी सतत काम करत शिक्षकांच्या समस्या दूर केल्याबद्दल यावेळी शिक्षकांनी राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील व महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our
Terms of Use and acknowledge the data practices in our
Privacy Policy. You may unsubscribe at any time.