खामगाव: शहरातील लक्कडगंज भागातील बारदानाच्या गोडाऊनला मोठी भीषण आग
शहरातील लक्कडगंज भागातील बारदानाच्या गोडाऊनला मोठी भीषण आग लागल्याची घटना आज दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. लक्कडगंज भागात मुन्ना पाडिया यांचे अग्रेसन ट्रेडिंग कॉर्पोरेशन सुतळीचे व्यापारी या नावाने गोडाऊन असून सदर गोडाऊन मध्ये मोठी भीषण आग लागली. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी खामगाव नगर परिषद च्या अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच शेगाव, नांदुरा येथील नगरपरिषद अग्निशामक दल सुद्धा दाखल झाले होते.
प्रतिनिधी इस्माईल शेख, CEN News खामगाव -बुलढाणा