कल्याण : खडेगोळवली नाल्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला K.D.M.C. कर्मचाऱ्यांनी वाचवले
कल्याण, खडेगोळवली – पावसाळ्याच्या सुरुवातीसच कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली. खडेगोळवली परिसरात एका व्यक्तीला नाल्यात वाहून जाताना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.
सुदैवाने घटनास्थळी तत्काळ पोहोचलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका (K.D.M.C.) चे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्या व्यक्तीचा जीव वाचवला. त्यांनी तत्काळ बचावकार्य राबवून व्यक्तीला सुरक्षित स्थळी आणले.
घटनेनंतर संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी केडीएमसीच्या कर्मचार्यांच्या वेळीच दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक केले आहे.