विश्वरत्न प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक कमिटीच्या वतीने पत्रकार
श्री बाबा लोंढे यांना पत्रकार दिनी राज्यस्तरीय दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मिळाल्याबद्दल , नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांना त्याच्या नाट्यक्षेत्रातील अतुलनीय कामगिरिबद्दल आणि 18 वी ज्यु गर्ल्स महाराष्ट्र स्टेट लेवल बॉक्सिंग चाम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल माटुंगा लेबर कॅम्प ,कर्मवीर दादासाहेब गायकवाड प्रांगणात सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. राहुल भंडारे , जागृती बहोत आणि बाबा लोंढे हे तिघेही माटुंगा लेबर कॅम्प चे रहिवाशी असल्याने या लेबर कॅम्प चे नावं उंचावले आहे. आजच्या या सन्मान समारंभां बरोबर राजमाता जिजाउ शहाजीराजे भोसले , क्रांतीज्योती सावित्रीबाइ ज्योती फुले आणि प्रथम मुस्लिम महिला शिक्षक फातिमा शेख यांची संयुक्त जयंती आणि मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला विभागातील सर्व गट -तट बाजूला ठेवून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने आशिष मोरे , सूर्यकांत भालेराव , सुनील कांबळे , अनिल भंडारे , शंभू देठे , रमेश काळे , डी के , मनोज कवडे , उदय साळवी ,नरसिंग , राजू पंडित , भारती शिंदे , नानकिताइ , बेंजामिन काकडे , देवा वाघमारे , नरेंद्र भालेराव , मिरवणूक कमिटी अध्यक्ष दीपक वाघ , अजय देठे आणि मिलिंद काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय देठे ,मिलिंद काळे व नरेंद्र भालेराव यांनी अथक परिश्रम घेतले .