इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यास मुख्यध्यापकाकडून अमानुष मारहाण..!
मूर्तिजापूर : येथील नगर परिषद च्या स्व.रामदासभैय्या दुबे सेमी इंग्लिश शाळेतील इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यास शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मात्र या घटनेबाबत पालकांन वर मोठा दबाव टाकला जात आहे.
शिक्षक प्रदीप झोडपे यांनी त्यांच्या शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या शेख अरान नामक विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण केल्या ची घटना समोर आली आहे. यात शेख अरान या चिमुकल्यास मोठी दुखापत झाल्याचे पालकांन कडून सांगण्यात येत आहे.
मूर्तिजापूर येथील नगर परिषद च्या स्व. रामदासभैय्या दुबे सेमी इंग्लिश शाळे मध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या शेख अरान व इतर विद्यार्थ्यांमध्ये पावसाच्या छत्री वरून भांडण झाले, या कारणावरून शाळेतील मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी शेख अरान या चिमुकल्यास अमानुष मारहाण करून त्याची मान दाबली यात अरान च्या मानेला जबर दुखापत झाल्याचे अरान च्या पालकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
मात्र या बाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांच्याशी संपर्क केला असता प्रदीप झोडपे यांनी इतर ६ ते ७ शिक्षकांच्या सहारे सदर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. व “असे काही घडलेच नाही, अरान हा पाय घसरून पडला व त्यास दुखापत झाली असल्याचे पत्रकारांना सांगा” असे पालकांवर दबाव टाकत असल्याचे पालकांनी बोलतांना सांगितले. तर सदर प्रकरण दडपण्या करीता शहरातील नावलौकिक एका माजी नगराध्यक्षांकडून सदर मुख्याध्यापकास पाठबळ देत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे.
सदर घटनेचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी व गटशिक्षणाधिकारी गांभीर्याने घेऊन अरान यास न्याय देऊन शिक्षकावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
____________
कॅमेरामन श्याम वाळस्कर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News , अकोला.