इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या सार्थकने विज्ञान प्रदर्शनी पटकविला प्रथम क्रमांक…!
—————————————-
आपल्या शाळेचे नाव केले सार्थक ने लौकिक..
—————————————-
मूर्तिजापूर :- “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ” याचा प्रत्येय इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ इन्टीग्रेटिव्ह एज्युकेशनच्या सार्थक विजय धारस्कर याने सिद्ध करवून दाखवीत आपल्या शाळेचे व आपले नाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक पटकवीत उंच शिखरावर रोविले आहे. सार्थक याने आपल्या चाणख्य बुद्धीतून वाहतूक आणि दळणवळण सुरळीत आणि अपघात विरहित होण्यासाठी शक्कल लढवीत वैज्ञानिक व यांत्रिक प्रात्यक्षिक दाखविले ज्या मुळे महामार्गांवर होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळविल्या जाऊ शकते. याचा भविष्यात मोठा फायदा होऊन वाहतूक सुरळीत होऊ शकतो या प्रत्येय मुर्तीजापुर येथे आयोजित ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी प्रथम क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात उंचावले आहे.
कल्पनाशक्ती सारखी शक्ती तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा या संकल्पनेतून मूर्तिजापूर येथील श्री व्यंकटेश बालाजी इंग्लिश हायस्कूल येथे ५२ वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन च्या शाळेस मिळाला सदर शाळेतील इयत्ता ९ विच्या बाल वैज्ञानिक सार्थक विजय धारस्कर या विद्यार्थ्याने महामार्गावर अपघातावर नियंत्रण मिळवण्याचे सुरक्षा यंत्र चा शोध लावला त्याच्या या कार्याचा जिल्हास्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत असून सार्थक याने आपल्या यशाचे श्रेय आपले आई, वडील व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणाली भटकर तसेच सर्व शिक्षा करून त्यांना दिले असल्याचे सार्थक याने बोलताना सांगितले.
—————————————
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर -अकोला.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our
Terms of Use and acknowledge the data practices in our
Privacy Policy. You may unsubscribe at any time.